ब्रिटानियाचा दुसर्‍या तिमाहीचा निकालः नफा २३ टक्क्यांनी वाढून ४९५ कोटी रुपये

मुंबई, २० ऑक्टोंबर २०२०: सोमवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर ब्रिटानिया इंडस्ट्रीजनं आपला निकाल जाहीर केला. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा २३ टक्क्यांनी वाढून ४९५.२० कोटी रुपये झाला. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ४०५.३७ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

इकॉनॉमिक टाइम्सच्या सर्वेक्षणात ब्रिटानियाचा नफा ४९८ कोटी रुपये असल्याचं विश्लेषकांनी वर्तवलं होतं. कंपनीचा एकत्रित महसूल १२.१ टक्क्यांनी वाढून ३,४१९.११ कोटी रुपये झाला. मागील वर्षात एकत्रित महसूल ३,०४८.८४ कोटी रुपये होता. कंपनीचे एमडी वरुण बेरी म्हणाले, “कोरोना विषाणूमुळं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की ज्यामुळं आर्थिक वाढीवर मोठा परिणाम झालाय. जगभरात ग्राहकांचं वर्तन देखील बदललं आहे.”

बेरी म्हणाले की, जेव्हा सरकारनं लॉकडाऊन संपविण्याची घोषणा केली तेव्हा असे दिसते की परिस्थिती सामान्य होण्यास थोडा वेळ लागेल. ते म्हणाले, “सप्टेंबरच्या तिमाहीत आम्ही आमच्या उत्पादनांची संपूर्ण श्रेणी बाजारात आणली. वितरणावर लक्ष केंद्रित केलं. आम्ही आमच्या वितरकांच्या आरोग्याकडेही पाहिलं. जाहिरात आणि प्रमोशनच्या बाबतीत आम्ही सामान्य पातळीच्या जवळ आलो.”

ते म्हणाले की, आव्हानात्मक काळात कंपनीनं आपल्या कामगिरीत लवचिकपणा दाखविला. यामुळं सर्व व्यवसायांची वाढ चांगली झाली. किंमतीच्या बाबतीत महागाईचा आमच्या काही मुख्य कच्च्या मालावर किरकोळ परिणाम झाला आहे. आम्हाला आशा आहे की, चांगल्या पावसामुळे चांगले पीक आल्यामुळं किंमती आणखी स्थिर होतील. ते म्हणाले की, या उपायांचा आमच्या व्यवसायावर चांगला परिणाम झाला. यामुळं, सप्टेंबर तिमाहीत आमच्या ऑपरेटिंग नफ्यात ३९० बेस पॉईंटने वाढ झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा