पुणे: स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच भारतामध्ये शिक्षणाचे महत्व समजना सुरुवात झाली होती. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच भारतात उच्चशिक्षित महान व्यक्ती बघावयास मिळाले होते. अठराव्या शतकापासूनच फुले यांनी शिक्षणाचा पाया घातला होता. यानंतर तत्कालीन शिक्षण मंडळाकडून पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यास सुरुवात केली गेली होती. काळानुसार हे पाठ्यपुस्तके विलुप्त होत गेली. जसजसे आधुनिकीकरण होत गेले तसे या पुस्तकांचा विसर पडत गेला व त्यामुळे यातील बरेचसे पुस्तके विलुप्त झाली.
काळाच्या ओघात जरीही मौल्यवान पुस्तके विलुप्त होत केली असली तरीही बालभारतीने यातील काही पुस्तकांचे व्यवस्थित जतन केले आहे. यातील काही प्रती बालभारतीकडे अजूनही आहेत अशाच स्वरूपात आहेत. अशा १८३७ ते १९४० पर्यंतच्या सुमारे दीडशे ब्रिटिशकालीन पुस्तकांचे डिजिटायझेशन करून त्यांचे संवर्धन करण्याचे काम बालभारतीने हाती घेतले आहे. बालभारतीच्या ग्रंथालयात पहिली ते बारावीपर्यंतचे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, पाली, संस्कृत या भाषांमधील सुमारे दीड लाख पुुस्तकांचा समावेश आहे. नवीन अभ्यासक्रम तयार करताना येथील पुस्तकांचा संदर्भ म्हणून वापर केला जातो.
बालभारती ची स्थापना १९६७ मध्ये झाली होती. तोपर्यंत ही जुनी पुस्तके जतन करून ठेवण्यासाठी कोणतीही सरकारी यंत्रणा यासाठी कार्यरत नव्हती. परंतु बालभारतीची स्थापना झाल्यानंतर लोकांनी आपल्याकडील ब्रिटिश कालीन हे दुर्लभ पुस्तके बालभारतीकडे जतन करण्यासाठी दिली. अभ्यासक्रम बदलल्यानंतर बाद झालेली पुस्तके पुन्हा संदर्भासाठी उपलब्ध होत नाहीत. २००५ पासूनची पुस्तके संकेतस्थळावर आहेत. आता १८३७ ते २००४ पर्यंतची पाठ्यक्रम, पाठ्येतर, मासिके, ज्ञानकोश या सर्व ग्रंथसंपदेचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये २ लाख २५ हजार पानांचा समावेश आहे.