“भाऊंचा केसांबरोबर मेंदू ही उडून गेला” संगीतकार विशाल ट्रोल….

मुंबई, २७ जानेवारी २०२१: संपूर्ण भारतात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मात्र, या पार्श्वभूमीवर बाॅलिवूड मधील अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि गायक विशाल ददलानी यांना सोशल मिडियावर ट्रोल करून त्यांच्यावर संताप व्यक्त करण्यात आला. तर अनेक चाहते नाराज झाल्याचे ही समोर आले.

भाऊंचा केसांबरोबर मेंदू ही उडून गेला….

बाॅलिवूड प्रसिद्ध संगीतकार विशाल ददलानी यांनी एका स्पर्धकाने इंडियन आयडल मध्ये “ऐ मेरे वतन के लोगो” हे गाणं सादर केले ज्यावर कौतुक केले. ज्या मधे हे गाणं लता मंगेशकरांनी १९४७ मधे पहीले पं. जवाहरलाल नेहरू समोर गायलं होते असे म्हटले. तर टीका झाल्यानंतर विशाल ने माफी मागितली. हे गाणे १९६२ मध्ये भारत चीन सैनिकांमधे झालेल्या युद्धादरम्यान शहिद झालेल्या जवानांनसाठी लता मंगेशकर यांनी गायले होते. पण, या सर्व प्रकारावर विशाल सोशल मिडियावर ट्रोल होत आहे.

शेट्टीची घोडचूक….

बाॅलिवूड मधील फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी ने “७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना खुपसाऱ्या शुभेच्छा, जय हिंद” असे ट्विट केले. ज्यामुळे तिला प्रजासत्ताक दिनाऐवजी स्वतंत्र्या दिनाच्या शुभेच्छा दिल्यामुळे चांगलेच ट्रोल करण्यात आले. या नंतर शिल्पाला चूक समजताच तिने ते ट्विट डिलीट केले.

बाॅलिवूड मधे हे दोन्ही कलाकार एका वेगळ्या उंचीवर असून यांचे अनेक चाहते आहेत. त्या मधे कलाकारांकडून होणाऱ्या अश्या चुकीमुळे सोशल मिडियावरून त्यांच्या चाहत्यांकडून टिकेचं सत्र सुरू होतं. तर अनेकांच्या भावनांना ठेच लागली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा