गोल पोस्ट महाराष्ट्र BSF मधील जवान सना आलम मुल्ला यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू 

BSF मधील जवान सना आलम मुल्ला यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू 

सांगली: सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आंधळी गावची सुकन्या जवान सना आलम मुल्ला या राजस्थानातील बिकानेर येथे शहीद झाल्या. सना आलम मुल्ला या २२ वर्षाच्या होत्या. सुरक्षा दलात सेवेत असताना त्यांना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. सना यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी आंधळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वृत्तामुळे गावात शोककळा पसरली आहे.
गेल्या तीन वर्षापासून सना या सेवेत होत्या. आठ दिवसांपूर्वी त्यांना विजेचा धक्का बसल्याचे समजते. राजस्थान येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुल्ला यांच्या मागे आई, वडील दोन भाऊ आहेत. वडील शेतमजूर असून सर्वजण आंधळी गावातच राहतात. सना यांना सोशल मीडिया वर सर्वजण श्रद्धांजली अर्पण केली.

error: Content is protected !!
Exit mobile version