गोल पोस्ट गुन्हा मुंबईत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

मुंबईत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

सध्या समाजात अराजकता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रा बरोबर संपूर्ण देशात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे दिवसागणिक प्रकरण घडतच असतात. आणि या सर्वात आता मुलींबरोबर मुलांवर देखील मोठ्या प्रमाणात लैंगिक हिंसाचाराचा प्रकरणात वाढ होताना दिसत आहे.
मुंबई च्या मलाड परिसरात १३ वर्षाच्या मुलाने १२ वर्षाच्या मुलावर लैंगिक शोषण करण्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटने वेळी मुलगा शाळेत जात असताना त्याला त्याला १३ वर्षाच्या मुलांने बोलावले आणि त्याच्या बरोबर प्रेमाने बोलुन त्याच्या बरोबर मैत्री निर्माण केली. आणि त्यानी त्याला बागेत घेऊन गेला आणि तिथे त्याचे लैंगिक शोषण केले.
पीडित मुलगा घडल्या घटनेनंतर घरी आल्यावर त्यांनी सर्व प्रकार घरी सांगितला तसे पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.शोषण केलेल्या मुलाचे वर्णन केले व त्या साह्याने पोलीसांनी मुलाला पकडून डोंगरीच्या बाल सुधार गृहात त्याची रवानगी केली.

error: Content is protected !!
Exit mobile version