आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका ‘बसपा’ स्वबळावर लढणार : मायावती

लखनऊ, १५ जानेवारी २०२३ : बहुजन समाज पक्ष प्रमुख मायावती यांनी आपल्या वाढदिवसालाच एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा आणि २०२४ ची लोकसभा निवडणुकीसाठी बसपा कोणत्याही राजकीय पक्षासोबत हातमिळवणी करणार नसून, स्वबळावरच या निवडणुका लढवणार असल्याचे मायवतींनी जाहीर केले आहे.

लखनऊ येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, पक्षाने उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आघाडीकरून निवडणूक लढवली मात्र, परिणाम आणि अनुभव योग्य राहिला नाही. म्हणून आता बसपा स्वबळावरच निवडणूक लढवणार आहे. तसेच काँग्रेस आणि काही अन्य पक्ष आमच्यासोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र, आमची विचारधारा ही अन्य पक्षांपेक्षा वेगळी आहे.

पुढे त्या म्हणाल्या, येणाऱ्या काळात ज्या निवडणुका होतील त्या बॅलेट पेपरद्वारे व्हाव्यात. या आधी ज्या निवडणुका ईव्हीएमद्वारे झाल्या. त्याबाबत लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपरद्वारे घेतल्या जाव्यात, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा