भोकरदन फुलेनगर येथील बौद्ध विहारात बुद्ध मूर्तिची स्थापना

भोकरदन, जालना २६ फेब्रुवारी २०२४ : भोकरदन शहरातील फुलेनगर येथील बौद्ध विहारात कालकथित हरणाबाई नामदेव दांडगे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराच्या वतीने बुद्धमूर्ती दान करण्यात आली. त्या मूर्तीची स्थापना रविवारी २५ रोजी भन्ते रेवत रामनगर जालना यांच्या हस्ते विधीवत करण्यात आली.
यावेळी प्रथम सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

फुलेनगर येथीलच रहिवासी कालकथित हरणाबाई नामदेव दांडगे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विहाराला बुद्धमूर्ती दान करण्याचा निर्णय परिवाराच्या वतीने घेण्यात आला होता. परिवारातील पती नामदेव दांडगे, रंजनाबाई राजू दांडगे, लक्ष्मीबाई संजय दांडगे, डॉ. स्वप्निल दांडगे, डॉ. प्रतीक दांडगे, पल्लवी दांडगे, साक्षी दांडगे यांनी परिवाराच्या वतीने दान दिलेल्या मूर्तीचे सकाळी १०.३० वाजता बुद्ध वंदना व पूजन भंतेच्या हस्ते करण्यात आले. तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आभिवादन साहमुहिक वंदना घेण्यात आली. कार्यक्रमानंतर खीरदान करण्यात आले.

यावेळी संपूर्ण दांडगे परिवारासह सुरेश बनकर, सचिन पारखे, डाके सर, मनोज दाभाडे, विशाल शेजुळ, गंभीरराव दाभाडे, डॉ. रावते, नागोराव साळवे, कैलास सिरसाठ, अनिकेत जगताप, खरात, पगारे, घोरपडे, लोखंडे, दाभाडे, आठवले यांच्यासह भोकरदन शहर, फुले नगर येथील महिला उपासिका- उपासकांची मोठ्या संख्येने उपस्थिति होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा