गोंदिया २८ जून २०२४ : पतसंस्था विभाग गोंदियाच्या बुलढाणा अर्बन सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनात महत्वाची जनसभा.ग्रामपंचायत सावरी येथे पार पडली. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण आणि गरजू लोकांना परवडणारी आणि सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीने स्पर्धा लक्षात घेऊन सुवर्ण कर्ज उत्पादनांमध्ये १ टक्क्याची नवीन आकर्षक ऑफर जाहीर केलीय. ही योजना इतर बँकांच्या तुलनेत कमी व्याजदर आणि सामाजिक लाभांसह देण्यात आली आहे.
समाजाच्या मते, ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. इतर स्पर्धक बँकांच्या तुलनेत वार्षिक व्याजदर आणि परतफेडीची सुविधा परवडणारी ठेवण्यात आली आहे, ज्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल. या नवीन योजनेची घोषणा ग्रामपंचायत सावरी येथे झालेल्या जाहीर सभेत करण्यात आली, यावेळी सोसायटीचे प्रवक्ते आणि ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच आणि स्थानीय ग्रामस्थ यांना योजनेच्या फायद्यांविषयी माहिती दिली. या सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : हंसराज