बुर्ज खलिफावर पडणाऱ्या विजेसाठी केली सात वर्षे प्रतीक्षा

17

दुबई: दुबईमध्ये भीषण वादळाचा तडाखा बसला. मुसळधार पाऊस पडला. संपूर्ण दुबईमध्ये पाणी साचले होते. पण त्यादरम्यान काहीतरी अस घडलं की एक छाया चित्रकार सात वर्षांपासून एका छाया चित्राची वाट पहात होता. हे दृश्य बुर्ज खलिफावर पडणाऱ्या विजेचे होते. हे दृश्य त्याच्या कॅमेर्‍यामध्ये कॅप्चर करण्यासाठी छायाचित्रकाराने पावसाच्या दरम्यान संपूर्ण वाळवंटातल्या छावणीत संपूर्ण रात्र घालवली जेणेकरून परिपूर्ण शॉट्स मिळू शकतील. शेवटी, सब्र का फल मीठा होता है या नुसार त्या छायाचित्रकाराला ते चित्र मिळाले.

जोहोब अंजुम असे या छायाचित्रकाराचे नाव आहे. शुक्रवारी रात्री आलेल्या वादळाच्या वेळी जगातील सर्वात उंच इमारतीवर वीज कोसळतानाचे छायाचित्र जोबे यांनी काढले. मध्यरात्री पाऊस पडण्याच्या दरम्यान जोहेब एका छोट्या कॅम्प मध्ये होते जेणेकरून त्यांना उत्तम चित्र मिळेल.

फोटो काढल्यानंतर जोसेब म्हणाले की २०२० मध्ये या फोटोने त्यांच्यासाठी चांगले वर्ष सुरू केले आहे. २७२० ​​फूट उंच बुर्ज खलिफाच्या माथ्यावर वीज पडली तेव्हा तो माझ्यासाठी खूपच अनमोल क्षण होता. जोहान अंजुमचे हे चित्र बुर्ज खलिफा आणि दुबईचे राजकुमार शेख हमदान यांच्या प्रशासनानेही आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केले आहे. जोजे म्हणाले की, जेव्हा विजेचा कडकडाट झाला तेव्हा दुबईचे संपूर्ण आकाश निळ्या प्रकाशाने रंगले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा