खोपोली, १२ डिसेंबर २०२२: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात झालाय. विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली. यामध्ये ४६ विद्यार्थी आणि २ शिक्षक जखमी झाले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झालाय. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
विशेष म्हणजे, मुंबईतील चेंबूर भागातील एका कोचिंग संस्थेत शिकणारे विद्यार्थी सहलीसाठी खोपोलीत पोहोचले होते. त्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बसला अपघात झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये ४८ जण होते.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
प्राथमिक माहितीनुसार, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोहोचलेल्या पोलिसांनी सर्वांना बाहेर काढलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे