नाशिक : नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात १० ते ११ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सात ते आठ जणांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे जात होती. बस आणि रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेशी फाट्याजवळ हा अपघात झाला. बस आणि रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. यावेळी आधी रिक्षा आणि नंतर बस कोसळली. यामुळे रिक्षामधील सात ते आठ प्रवासी जागीच ठार झाले. तर बसमधील तीन प्रवासी ठार असून हा आकडा वाढण्याची भीती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.