बॉलिवूड : रितेश देशमुख दिग्दर्शक आणि लेखक मिलाप जावेरीचा चित्रपट ‘मरजावां’ मध्ये निगेटिव्ह रोल करत आहे. यामध्ये त्याच्या पात्राची उंची तीन फूट आहे आणि ही पहिलीच वेळ आहे जेव्हा तो बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. हे शूट करताना त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्याने सांगितले, “सेटवर मी सोडून बाकी सर्वांचे सीन लवकर शूट व्हायचे. कारण मला एक सीन शूट करण्यासाठी कमीत कमी पाच टेक घ्यावे लागत होते. माझ्या भूमिकेच्या कमतरतांवर फ्यूचर स्टूडियोजने खूप काम केले आहे.”
मिलापसोबत रितेशचा हा आहे दुसरा चित्रपट… रितेशने आपल्या भूमिकेविषयी सांगितले, “या व्यक्तीमध्ये तीन फुटांचा असूनही कोणतीही कमतरता दिसत नाही. कारण हा इतरांना आपल्याच उंचीचा समजू लागतो. मी माझ्या पद्धतीने ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की, लोकांना आवडेल.” रितेश यापूर्वी ‘एक व्हिलन’ या चित्रपटात निगेटिव्ह रोलमध्ये दिसला होता. याचे डायलॉग्सदेखील मिलाप जावेरीनेच लिहिले होते.
कमल हसन आणि शाहरुख यांच्याशी तुलनेवर… रितेशपूर्वी कमल हसन यांनी ‘अप्पू राजा’ मध्ये आणि शाहरुख खानने ‘झिरो’ मध्ये बुटक्या व्यक्तींची भूमिका साकारली आहे. यांच्याशी केलेल्या तुलनेवर रितेश म्हणतो, “कमल सर कोणत्याही टेक्नोलॉजीच्या वर आहेत आणि जर शाहरुखबद्दल बोलायचे तर मी तो चित्रपट पहिला नाहीये. मात्र जेव्हा तो हा चित्रपट शूट करत होता, तेव्हा मी त्याला भेटायला गेलो होतो. त्याने मला 45 मिनिटांचे फुटेज दाखवले होते, ज्यामध्ये तो आपल्या भूमिकेला उत्तम पद्धतीने करताना दिसत होता. मी या दोन्ही अभिनेत्यांशी आपली तुलना कधी करूच शकत नाही.”
सिद्धार्थ – रितेश दोघांचाही विचित्र अनुभव… चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असलेला सिद्धार्थ मल्होत्राने सांगितलेत, “जास्तीत जास्त सीन रितेश आणि मी एकटा शूट करत होतो. हे कधी कधी खूप विचित्र आणि कठीण वाटायचे. कारण मला सर्व डायलॉग्स खाली पाहून बोलावे लागायचे.” यावर रितेश म्हणाला, “आणि माझ्यासाठीही हे कठीण आणि विचित्र होते कारण, मला डायलॉग्ससोबत रिएक्शंसदेखील वरती पाहून द्याव्या लागायच्या. संपूर्ण चित्रपट आम्ही असाच शूट केला आहे.”