व्यापाऱ्यावर चाकूने वार करुन; लाखो रुपये लुटले

लातूर, २४ सप्टेंबर २०२२: लातुर शहरात एका व्यापाऱ्यावर चोरट्यांनी चाकुने वार करत त्याच्या अंगठा तोडून, त्याच्याकडून लाखो रुपये तसेच मोबाईलची लुट करण्यात आली आहे‌. हा धक्कादायक प्रकार लातूर बाजार पेठेत घडला आहे.

एक व्यापारी आपले दुकान बंद करुन घरी जात असताना व्यापाऱ्यावर एका अज्ञात दुचाकीस्वारांनी हल्ला केला. चाकूने वार करत व्यापाऱ्याचा अंगठा तोडला. व त्याच्याकडून एक लाख ऐंशी हजार रुपयांची रोकड आणि पाच हजार रुपयांचा मोबाईल असा ऐवज चोरुन नेला आहे.

मदन गंगाधरराव बीदरकर असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यानी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बीदरकर यानी दिलेल्या माहितीनुसार गांधी मार्केट येथील दुकान बंद करुन रात्री आठ वाजता आपल्या दुचाकीवरुन घरी जात असताना उड्डाणपुलावर पाठीमागून एक दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी हाक मारली. मागे वळून पाहीले असता एकाने गाडीला लाथ मारली व पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रतिकार केला असता त्याने चाकूने वार करण्यास सूरवात केली.

त्यामध्ये हातावर वार करत अंगठा तोडला व रोकड आणि मोबाइल घेऊन पसार झाले. असे तक्रारीत म्हणाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा