Bye -bye cricket

पुणे 8 जून 2022: तब्बल 10 वर्षानंतर क्रिकेट खेळाडू मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुड बाय केलं आहे. आपल्या 23 वर्षाच्या कारकिर्दीत तीने आपले चाहते आणि BCCI ला धन्यवाद म्हटले आहे. यावेळी तिने म्हंटले की जेव्हा मी निळी जर्सी घालून मैदानावर उतरले होते आणि देशाचे प्रतिनिधीत्व करत होते, तेव्हा मी लहान होते. गेली २३ वर्षे मी हा प्रवास करत आहे. आता हा प्रवास संपत आहे, असे ट्विटही तिने केले आहे. आता हा प्रवास संपल्यानंतर या जागेवर कोण नवा दावेदार येणार, हे पाहणं महत्त्वाचे आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून मितालीने 7 एकदिवसीय शतके आणि 1 कसोटी शतकांसह आंतरराष्ट्रीय कारकिर्द गाजवली. वनडेमध्ये 64 अर्धशतके, टी -20 मध्ये 17 अर्धशतके अशी कारकिर्द गाजवली. यावेळी मितालीने BCCI चे मानद सचिव जय शाह यांचे मनापासून आभार मानले. मिताली 2017 च्या महिला विश्वचषकात एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली.

सोशल मिडीयावर संदेश देताना मितालीने अतिशय भावुक झाल्याचे सांगितले. हा खेळाचा प्रवास इथेच थांबला असे म्हणत तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुड बाय केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा