गोल पोस्ट राष्ट्रीय सीएए विरोधी राज्यांत राष्ट्रपती राजवट लागू करा ; कोर्टात याचिका

सीएए विरोधी राज्यांत राष्ट्रपती राजवट लागू करा ; कोर्टात याचिका

अलाहाबाद : ‘सीएए’ला विरोध करणाऱ्या व या कायद्याविरुद्ध ठराव संमत करणाऱ्या राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
वकील अशोक पांडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. देशातील अनेक राज्य नागरिकत्व कायद्याविरुद्ध उभी ठाकली आहेत.
हा कायदा आमच्या राज्यात लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. केरळ व पंजाब या दोन राज्यांनी तर नागरिकत्व कायद्याविरुद्ध विधानसभेत ठरावही मंजूर केला आहे. या कायद्यावर फेरविचार करण्याची मागणी या राज्यांनी केली आहे.
पश्चिम बंगाल व महाराष्ट्र ही दोन राज्यही असा ठराव करण्याच्या वाटेवर आहेत, असे पांडे यांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version