गोल पोस्ट राष्ट्रीय CAA हिंसाचारावर कंगना संतापली

CAA हिंसाचारावर कंगना संतापली

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सध्या देशभर तीव्र आंदोलन होत आहेत.तसेच देशात अनेक ठिकाणी हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जात आहे. या सर्व प्रकारावर अभिनेत्री कंगना रणौतने मौन सोडले असून हिंसाचार करणाऱ्या लोकांना सुनावले आहे.

कंगना म्हणाली की, जेव्हा तुम्ही निषेध करता तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हिंसक होऊ नका. आमचे केवळ ३-४ टक्के लोक कर भरतात. उर्वरित त्यांच्यावर अवलंबून असतात. तर तुम्हाला बस – ट्रेन जाळण्याचा आणि गोंधळ घालण्याचा अधिकार कोणी दिला?
दरम्यान, कंगना रणौतचा आगामी ‘पंगा’ या चित्रपटातील फर्स्ट लूक नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version