नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा

मुंबई, १९ ऑगस्ट २०२३ : कॅगच्या एका अहवालामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. मोदी सरकारच्या ७ प्रकल्पांचा आणि योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार असल्याचा ठपका केंद्र सरकारवर कॅगने ठेवला आहे. ७ योजनांपैकी नितीन गडकरी यांच्या खात्यांतील ३ कामांवर कॅगने ताशेरे ओढलेत. मात्र नितीन गडकरी यांचा काटा काढण्याचा डाव असल्याची शंका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितीत केली आहे.

या प्रकल्पामध्ये कामाच्या मंजुरीचा खर्च आणि प्रत्यक्षात कामावर झालेला खर्च यात तफावत दिसून येते. एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी २५० कोटींचा खर्च करण्यात आल्याचे ताशेरेही कॅगने ओढले आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यामध्ये भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स,आयुष्यमान भारत,पेन्शन योजना, द्वारका महामार्ग,अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत.

कॅगचा अहवाल समोर आल्याने देशभर एकच खळबळ उडाली असुन या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यांवर अधिक ताशेरे ओढण्यात आले आहेत. आता या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल आला असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा