कॅगच्या रिपोर्टमुळे खाजगी कंपन्या आणि केंद्र सरकारचा सावळा गोंधळ उघड – रोहित पवार

मुंबई, २८ सप्टेंबर २०२० : मुंबई ‘कॅग’ च्या रिपोर्टमुळे स्टार रेटिंगचा बुरखा ‘कॅग’ने आपल्या अहवालात उघड केल्याने आपल्या सरकारी एजन्सी कशा पद्धतीनं काम करतात याचं पितळ उघडे पडले यामध्ये ग्राहकाचे खुप मोठे नुकसान झाले असल्याचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
केंद्र सरकारने विजेच्या बचतीसाठी कमी विजेवर चालणाऱ्या वस्तूंसाठी ब्युरो ऑफ एनर्जी एफिसीयन्सी (BEE) स्टार रेटिंग देण्यात येते. यामध्ये वीज बचत करणे तसेच याचा थेट संबंध हा प्रदूषणाशी आहे.

विजेचा जेवढा जास्त वापर तेवढं प्रदूषण कमी, त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना वीज बचतीबाबत देण्यात आलेलं स्टार रेटिंग पाहून ग्राहक अशा वस्तूंची खरेदी करत असतात. या रेटिंग साठी (BEE) या सरकारी एजन्सीकडून सर्व पूर्तता केल्यावर मान्यता दिली जाते ही पूर्तता न केलेल्या देशभरात सुमारे २२०० कोटी रुपयांच्या फ्रीज आणि एसींची विक्री झाल्याचं ‘कॅग’ने आपल्या अहवालात नमूद केले.

२०१३ ते १८ या सालात फ्रीज आणि एसीच्या १.७२ टक्के संचाची तपासणी करण्याचं निश्चित ठरले असताना केवळ ०.१६ टक्के इतक्या एवढ्याच संचाची (BEE ) ने तपासणी केली. ५१ संचांपैकी ३२ संच हे पूर्ण निष्क्रिय ठरले तरीही २२०० कोटी रुपयांच्या फ्रीज व एसीची विक्री झाली होती.असा एकूण सावळा गोंधळ आहे,” यामध्ये केवळ ग्राहकाचे नुकसान असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा