टेलिकॉम कंपनीला ७१ वर्षीय आजोबांचा २४ हजार वेळा फोन;पोलिसांनी घेतले ताब्यात

नवी दिल्ली : अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना संपर्कासाठी ग्राहकांच्या सुविधेसाठी टोल फ्री क्रमांक देतात. या टोल फ्री एका टेलिकॉम कंपनीसाठी एक व्यक्ती खूपच त्रासदायक ठरली. ७१ वर्षीय एका आजोबांनी कंपनीला २४ हजार वेळा फोन केला. आता त्यांची अडचण काय होती, हे तर माहीत नाही, पण कंपनीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या आजोबांना उचलून नेले.
ही घटना जपान येथे घडली आहे. एकिटोशी ओकमोटो नावाची ही व्यक्ती रिटायर्ड आहे. ते सैतामामध्ये राहतात. त्यांना पोलिसांनी व्यापारात अडसर निर्माण करण्याच्या कारणावरून अटक केली. त्यांच्यावर आरोप आहे की, गेल्या दोन वर्षांत एका टेलिकॉन कंपनीला त्यांनी २४ हजार वेळा फोन केला. ते कंपनीच्या सर्व्हिसबाबत हैराण होते आणि सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून माफीची मागणी करत होते.

एका आठवड्यात ४११ वेळा फोन ऑक्टोबर महिन्यात केवळ एका आठवड्यात एकिटोशी यांनी टोल फ्री नंबरवर ४११ वेळा फोन केला. ते सतत रेडिओ ब्रॉडकास्ट सर्व्हिसचा वापर करू शकत नसल्याची तक्रार करत होते.
टेलिकॉम कंपनीला आढळून आलं की, आजोबांनी त्यांना २४ हजार वेळा फोन केला. कंपनीच्या रेकॉर्डनुसार, एकिटोशी दर दिवशी कमीतकमी ३३ वेळा फोन करत होते. कंपनीने आधी दुर्लक्ष केलं, नंतर पोलिसांत तक्रार दिली.

याबाबत कंपनीने सांगितले आहे की, त्यांच्या सतत फोन करण्याने कंपनीचे कर्मचारी दुसऱ्या ग्राहकांचे फोन घेऊ शकत नव्हते. जपानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, एकिटोशी पुन्हा-पुन्हा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन करून म्हणत होते की, ‘माझ्याकडे या आणि आपल्या कॉन्ट्रॅक्टचे उल्लंघन करण्याची व चुकीच्या पद्धतीने व्यापार करत असल्याची माफी मागा.’ आता पोलिसांनी त्यांना अटक केली असून चौकशी सुरू आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा