गोल पोस्ट राष्ट्रीय कॉलगर्ल च्या रूपात स्वतःची पत्नी

कॉलगर्ल च्या रूपात स्वतःची पत्नी

उत्तराखंड : उत्तराखंड येथील काशीपुर येथे एका व्यक्तीने फोन करून कॉलगर्ल बोलवले.मात्र, त्या इसमासमोर त्याचीच पत्नी कॉलगर्ल म्हणून आल्याने त्याला धक्काच बसला. ही घटना उत्तराखंड येथील काशीपूर इथे घडली आहे. त्यामुळे एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर या पती-पत्नीत कडाक्याची भांडणं झाली आहे. त्यांनी एकमेकांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत.

याबाबत एका वृत्त ओत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, दिनेशपूर येथे राहणाऱ्या राहुल (बदललेले नाव) विवाह काही वर्षांपूर्वी काशीपूर इथल्या नेहा (बदललेले नाव) हिच्याशी झाला होता. पण, लग्नानंतर नेहा वारंवार तिच्या माहेरी म्हणजे काशीपूर येथेच जाऊन राहत असे. या नेहाची एक मैत्रीण होती. काही कारणास्तव या दोघींचं भांडण झालं. त्या रागास्तव या मैत्रिणीने नेहा ही कॉलगर्ल म्हणून काम करत असल्याची माहिती राहुलला दिली.
राहुलला याच्यावर आधी विश्वास बसला नाही. त्यामुळे त्याने याची खात्री करून घेण्याचं निश्चित केलं. नेहाच्या मैत्रिणीने त्याला श्यामपुरम इथे राहणाऱ्या एका महिला दलालाच्या माध्यमातून नेहा काम करते, अशी माहिती पुरवली.

त्या माहितीच्या आधारे राहुलने त्या महिला दलालाला गाठलं आणि ग्राहक असल्याची बतावणी केली. तिने त्याला काही फोटो दाखवले. त्यात त्याच्या पत्नीचाही फोटो होता. त्याला तो फोटो पाहून धक्का बसला. मग त्याने नेहाला रंगेहाथ पकडण्यासाठी तिचाच फोटो निवडला. जेव्हा नेहा कॉलगर्ल म्हणून राहुलसमोर आली तेव्हा तिलाही धक्का बसला. एकमेकांसमोर आल्यानंतर त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. शेवटी हे प्रकरण पोलिसात गेलं. तिथे नेहाने राहुलचे तिच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आणि आपल्याला मारहाण आरोप केला. तर राहुलनेही नेहावर आरोप केले. सध्या या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version