गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे कमांडो स्पर्धेत “महाराष्ट्र फोर्स वन” प्रथम

कमांडो स्पर्धेत “महाराष्ट्र फोर्स वन” प्रथम

पुणे : राज्य रखीव पोलीस बल गट क्र१ व गट क्र २ व फोर्स वनच्या संयुक्त विद्यमाने दहावी अखिल भारतीय कमांडो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि.११ डिसेंबर ते २१डिसेंबरपर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात पुणे येथे झालेल्या स्पर्धेत “महाराष्ट्र फोर्स वन” च्या टीमने प्रथम क्रमांक मिळवला.
या स्पर्धेत एकूण २२ संघांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा रनिंग, ऑफस्टिकल, फायरिंग, जंगल ऑपरेशन यांसह आदी विविध प्रकारात ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. यावेळी एडिजी सुखविंदर सिंग, पोलीस अधीक्षक डोईफोडे, व ट्रेनिंग इंचार्ज गायके यांनी ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्यात पुन्हा २६/११सारखा हल्ला घडू नये “फोर्स वन”ची निर्मिती केली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version