गोल पोस्ट गुन्हा उन्नाव बलात्कार प्रकरणी कुलदीप सिंह सेंगला जन्मठेपेची शिक्षा

उन्नाव बलात्कार प्रकरणी कुलदीप सिंह सेंगला जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. यावेळी न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगरला पीडितेला २५ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे.
संपूर्ण देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणात कुलदीप सिंह सेंगरला न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी दोषी ठरवलं होतं. यावेळी १९ डिसेंबरला शिक्षेवर सुनावणी करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version