कॅनडा : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या पत्नी सोफी यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी महिती माध्यमांतून प्राप्त झाली आहे.
पंतप्रधान ट्रूडो यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली की नाही याबाबच चाचणी घेण्यात आली होती. तपासणीअंती त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी सोफी ट्रूडो या फ्ल्यूची लक्षणे दिसल्यानंतर त्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोफी या गुरुवारी ब्रिटनहून परतल्यानंतर त्यांना फ्लूसारखी लक्षणे दिसत असल्याचेही समजले.
आपल्याला ताप येत असल्याची तक्रार सोफी यांनी आपल्या डॉक्टरांकडे केली. त्यानंतर त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना कोरोनाची तपासणी करण्याचा सल्ला दिला होता. तपासणीत कोरोना चाचणी सकारात्मक अली आहे.