गोल पोस्ट इतर राजकारण एमएमआरडीए मधील एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त करावे: आ. सिद्धार्थ शिरोळे

एमएमआरडीए मधील एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त करावे: आ. सिद्धार्थ शिरोळे

पुणे, १६ डिसेंबर २०२०: एमएमआरडीए मधील पदांच्या निवडणुका झालेल्या एस ई बी सी च्या प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत ची मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी अजित दादा पवार यांना केली आहे.

एमएमआरडीए अंतर्गत ९ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेली जाहिरात व निवड यादी तील एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना नेमणुका होऊन डॉक्यूमेंट वेरिफिकेशन सुद्धा झाले मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एसईबीसी आरक्षण रद्द करण्याच्या अगोदर जर जागा भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर मुलांना वेठीस धरणे योग्य नाही. म्हणून तात्काळ राज्य सरकारने या उमेदवारांना नियुक्ती द्याव्यात, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अडवोकेट जनरल यांचा अभिप्राय घेऊन सदर विषयावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे, असे शिरोळे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version