दौंड येथे गांजाची शेती करणाऱ्यास अटक

दौंड, दि. ६ जून २०२० : दौंड तालुक्यातील गिरीम गावात गांजाची शेती करणाऱ्या दत्तू शंकर शिंदे (वय ४७) याला पुणे ग्रामीण पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून शुक्रवार (दी.५) रोजी अटक केली आहे. तर या छाप्यात पोलीसांना जवळपास एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला असल्याने तालुक्यात गुन्हेगारीच्या विविध माध्यमांचा वापर पुन्हा नव्याने आढळून आला आहे.

दौंड तालुक्यातील गिरीम गावात गांजाची शेती करीत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या सहकार्याने ही कामगिरी पार पाडली. या कारवाईत गांजाची १७३ झाडे व काही प्रमाणात विक्रीस असलेला माल आढळून आलेला आहे त्याची किंमत साधारणपणे एकवीस लाखाच्या घरात असल्याने या व्यवसायाची व्याप्ती मोठी असल्याचे आढळून आले आहे. दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी याबाबत मार्गदर्शन केले आहे.

दौंड तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रात अवलंब केल्या जाणाऱ्या विविध पद्धती पाहता ग्रामीण भागात देखील गुन्हेगारांनी आपले बस्तान बसवले असून यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत दौंड पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा