गांजा देशात कायदेशीर असावा, यासंबंधित कायदे कालबाह्य: रणवीर शौरी

मुंबई, ११ ऑक्टोंबर २०२०: रणवीर शोरे सध्या आपल्या वेबसीरीज ‘हाय’ साठी चर्चेत आहे. सध्या बॉलीवूडमधील सुरू असलेल्या ड्रग्स च्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही वेबसिरिज आली आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात, एनसीबी’नं केलेल्या तपासात सापडलेल्या चॅट मध्ये अनेक बॉलीवूड स्टार’ची नाव आली आहेत. ज्यामध्ये दीपिका पादुकोण श्रद्धा कपूर आणि सारा अली खान त्यांची नावं आहेत.

या प्रकरणापासून बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा मुद्दा चर्चेत आहे. रणवीरची वेबसीरिजही मॅजिक नावाच्या ड्रग’शी संबंधित आहे. रणवीरचं म्हणणं आहे की गांजा आणि सीबीडी तेलासारख्या गोष्टी देशात कायदेशीर असाव्यात कारण त्यासंबंधीचे कायदे खूप जुने आहेत आणि त्याचा वैद्यकीय लाभही आहे.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रणवीर म्हणाला- मला वाटतं की, समाजात अमली पदार्थांचं प्रमाण जितकं जास्त आहे तितकं ते बॉलीवूडमध्येही आहे. मोठ्या-बॉलिवूड पार्ट्यांमध्येही ड्रग्जचा वापर होताना मी पाहिलं आहे. रणवीर फक्त सीबीडी तेलच नव्हे तर गांजाला कायदेशीर बनवण्याच्या बाजूनं आहे.

तो म्हणाला की, गांजाला भारतात कायदेशीर केलं पाहिजे, असं वाटणारऱ्यांमध्ये मी देखील आहे. बर्‍याच देशांमध्ये हे कायदेशीर केलं गेलं आहे आणि गांजा देखील अशाच कायद्यांना बळी पडला आहे जे कित्येक वर्षापासून बदलले गेलेले नाहीत. गांजा संबंधित कायदे फार जुने आहेत आणि आता ते बदलले जाण्याची वेळ आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा