बारामती मध्ये एक लाख रुपये किमतीचा गांजा जप्त

बारामती, दि. ९ जुलै २०२० : बारामती गोपनीय विभागाला खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून आमराई येथील अनंतआशा नगर येथे धाड टाकून एक लाख रुपये किमतीचा ३ किलो २२५ ग्राम गांजा जप्त करण्यात बारामती पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

बारामती शहर गोपनीय पथकाला मिळालेल्या माहिती नुसार अमराई परिसरातील अनंतआशा नगर येथे गांजा विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावर बारामती शहर पोलिसांनी सापळा रचून येथे धाड टाकली. यामध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दीपक प्रकाश सकट व सेवक प्रकाश सकट हे दोघे घरातील आडीचा फायदा घेऊन बोळातून पळून जाण्यात यशस्वी झाले.पोलिसांनी घराची झडती घेतली असता घरगुती वापरातील पाण्याची भांडी कळशी व हंड्यात जवळपास १ किलो २२५ ग्राम गांजा प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवलेला सापडला तर सुनीता सकट यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर एन.डी.पी.एस.कायद्यांतर्गत बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पद्मराज गंपले करीत आहेत.

पोलिसांच्या आजच्या कारवाई मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले, सहाय्यक पोलीस अधिकारी योगेश शेलार, सहा. फौजदार संदीपान माळी, ओंकार शिताप, राजेश गायकवाड, सिद्धेश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे, अंकुश दळवी, दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी, उमेश गायकवाड, अकबर शेख यांचा सहभाग होता .

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा