गोल पोस्ट गुन्हा आंध्र प्रदेश विजयवाडा येथे २७.३ लाख रुपयांचा गांजा जप्त, दोघांना अटक

आंध्र प्रदेश विजयवाडा येथे २७.३ लाख रुपयांचा गांजा जप्त, दोघांना अटक

विजयवाडा (आंध्रप्रदेश) २६ जून २०२० : – विजयवाड्यात गुरुवारी २७.३ लाख रुपये किंमतीचा ५४६ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला . या प्रकरणी इलुवालाई व्यंकटेश आणि लॉरी क्लीनर या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी जिल्ह्यातील नुन्ना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रकाश नगर येथे वाहनांचा शोध घेतला. त्यावेळेस त्यांना रहस्यमय परिस्थितीत एक लॉरी तामिळनाडूला जात असल्याचे आढळून आले . पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना समजले की विशाखापट्टणमच्या यालमांचीली जवळ महामार्गावर गांजा लोड करण्यात आला आहे. हा ट्रक विजयावाडा येथून तामिळनाडू येथील रायवेलोर येथे नेला जात होता अशी माहिती पोलिसांनी दिली .

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version