कार्गो एक्सप्रेस धावणार डिसेंबर पर्यंत

सोलापूर, २९ सप्टेंबर २०२० : देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवासी सेवा बंद केली आहे. त्यामुळे पार्सल सेवेवर देखील याचा परिणाम झाला आहे. पुर्ण देशामध्ये नाशवंत माल आणि जीवनावाश्यक वस्तू पोहचविण्यासाठी पार्सल कार्गो एक्सप्रेस (किसान रेल सेवा) सुरू करण्यात आली आहे. २४ सप्टेंबर रोजी ट्रायल बेसेस वर सांगोला सिकंदराबाद किसान लिंक रेल्वे सुरू करण्यात आली. या गाडीला मिळालेल्या समाधानकारक प्रतिसादामुळे आठवड्यातून एकदा ही गाडी चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दि ५ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर दरम्यान दर गुरूवारी सांगोला स्थानकावरून सकाळी ११ वाजता ही गाडी निघेल आणि सोलापूरात दुपारी १.३० ला पोहचेल व १.३५ मिनिटाने तीचे वाडी कडे प्रस्थान होईल, वाडी मध्ये ती ४.२५ ला पोहचेल व ४.४५ ने तीचे सिकंदराबादकडे प्रस्थान होईल. रात्री ८ वाजता ती सिकंदराबादला पोहचेल.

दरम्यान आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी ही गाडी सिकंदराबादच्या रेल्वे स्थानकावरून रात्री ११.४५ वाजता निघेल आणि वाडी स्थानकात रात्री ३.३० वाजता पोहचून रात्री ३.४५ मिनिटाने प्रस्थान करेल व दुस-या दिवशी सकाळी ६ वाजता सोलापूर स्थानकात पोहचेल. सोलापूर विभागातील नागरिकांनी या विशेष पार्सल सेवा गाडीचा लाभ घ्यावा असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा