मुंबई, १४ सप्टेंबर २०२०: खासगी इक्विटी कंपनी कार्लाईल ग्रुप रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआईएल) च्या रिटेल आर्ममध्ये २ अब्ज डॉलर्सची हिस्सेदारी खरेदी करू शकते असं सांगितलं जात आहे. एका आर्थिक वृत्तपत्रानं सोमवारी हे वृत्त दिलं. या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींकडून या वृत्तपत्राला ही माहिती मिळाली.
वर्तमानपत्रानं लिहिलं आहे की जर हा करार झाला तर कार्लाइलची ही भारतातील कोणत्याही कंपनीतली सर्वात मोठी गुंतवणूक असल. कार्लाइलची ही भारताच्या रिटेल क्षेत्रातली पहिली गुंतवणूक असल. रिलायन्स आणि कार्लाईल यांनी या कराराबाबत रॉयटर्सच्या प्रश्नांवर भाष्य केलं नाही.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना आरआयएलच्या रिटेल युनिटमध्ये हिस्सा विकायचा आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी अशी बातमी आली होती की, ते (मुकेश अंबानी) ॲमेझॉनला २० अब्ज डॉलर्स किंमतीचा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल युनिटमधील हिस्सा विकतील. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीनं ही माहिती दिलीय.
रिलायन्स रिटेल ही आरआयएलची रिटेल शाखा आहे. सूत्रांनी सांगितलं होतं की ॲमेझॉननं रिलायन्स रिटेल व्हेंचरमध्ये गुंतवणूक करण्याविषयी बोललं आहे. रिलायन्स रिटेलमधील भागभांडवल खरेदी करण्यात रस दाखविला आहे. आरआयएलला ४० टक्के रिटेल युनिट अॅमेझॉनला विकायची आहे.
आज रिलायन्सच्या शेअर्समध्ये तेजी बघण्यास मिळाली. सकाळी ११.४५ वाजता स्टॉक ०.६८ टक्क्यांनी वधारला आणि २,३३५ रुपयांवर बंद झाला. यावर्षी रिलायन्सच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झालीय. याचं कारण म्हणजे रिलायन्सनं निर्धारित वेळे आधीच कर्जातून मुक्त होण्याचं आपलं ध्येय गाठलं आहे. त्यांनी आपल्या टेलिकॉम युनिट जियो प्लॅटफॉर्ममधील हिस्सा गुगल, फेसबुकसह अनेक बड्या कंपन्यांना विकला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे