राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल, द्रौपदी मुर्मू यांच्यावर वादग्रस्त ट्विट

मुंबई, 28 जून 2022: एका वादग्रस्त ट्विटमुळं प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वर्मा यांच्यावर आयटी कायद्यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज सिंह यांनी हजरतगंज कोलवली येथे हा गुन्हा दाखल केलाय.

नेत्यांनी तक्रार केली होती

राम गोपाल वर्मा यांनी द्रौपदी आणि पांडवांवर वादग्रस्त ट्विट केलं होतं. याबाबत भाजपमधून नाराजी व्यक्त होत होती. वादग्रस्त ट्विटमुळं राम गोपाल वर्मा कायदेशीर अडचणीत सापडले होते. भाजपच्या नेत्यांनी पोलिसांकडं तक्रारही केली होती.

वर्मा यांनी हे वादग्रस्त ट्विट केलं

‘रंगीला’ आणि ‘सत्या’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या राम गोला वर्मा यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यावर ट्विट केलं आहे. त्यांनी लिहिलं होतं, “जर द्रौपदी राष्ट्रपती असेल तर पांडव कोण आहेत? आणि महत्त्वाचे म्हणजे कौरव कोण आहेत?” त्यांच्या या ट्विटचा सोशल मीडिया वापरकर्त्यांनी निषेध केला आणि आक्षेपही घेतला.

प्रकरण पुढं गेल्यानंतर भाजप नेते गुडूर रेड्डी आणि टी. नंदेश्वर गौर यांनी राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात हैदराबादमधील अबिड्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी वर्मा यांच्यावर एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मुर्मू यांच्यावर अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप केला होता.

राम गोपाल यांचा केला निषेध

आबिडचे पोलिस निरीक्षक बी. प्रसाद राव यांनी वर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याबाबत बोलले होते. त्यांनी सांगितलं होतं, “आम्हाला तक्रार प्राप्त झाली आहे आणि ती कायदेशीर सल्ल्यासाठी पाठवण्यात आलीय. कायदेशीर सल्ला मिळाल्यानंतर आम्ही वर्मा यांच्याविरोधात एससी/एसटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करू.”

त्याचवेळी आंध्र प्रदेश भाजपचे प्रमुख सोमू वीरराजू यांनी राम गोपाल वर्मा यांच्या ट्विटवर जोरदार टीका करत कठोर कारवाईची मागणी केली होती. राम गोपाल वर्मा यांना तुरुंगात पाठवावं, असंही ते म्हणाले. तसंच, मानसोपचार तज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करावी.

वाद सुरू झाल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं होतं की, त्यांचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने घेण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा