गोल पोस्ट राष्ट्रीय नुपूर शर्मा विरुद्धचे देशभरातील खटले दिल्लीत वर्ग

नुपूर शर्मा विरुद्धचे देशभरातील खटले दिल्लीत वर्ग

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२२: नुपूर शर्मा यांच्या विरोधातील सर्व गुन्ह्यांचा तपास आता दिल्ली पोलीस करणार आहेत. देशभरातील नोंदविले गेलेले गुन्हे दिल्लीत वर्ग करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

नुपूर यांच्या जीवाला धोका असल्या कारणाने हे आदेश देण्यात आल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. यापुढंही जर शर्मांवर देशात कुठंही गुन्हा दाखल झाल्यास तो दिल्ली पोलिसांकडं वर्ग होईल, तसंच त्यांना या आधी दिलेले अटके पासूनचे संरक्षण पुढं हि कायम असेल असे आदेश न्यायमुर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरुराज पोरे

error: Content is protected !!
Exit mobile version