विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान मोदी सरकार शब्दावर आक्षेप घेतल्याने ग्रामस्थांवर गुन्हे

5

जालना ५ जानेवारी २०२४ : महाराष्ट्र सरकारव्दारे आयोजित विकसित भारत संकल्प याञा कार्यक्रमादरम्यान मोदी सरकार या शब्दावर आक्षेप घेऊन आंदोलन केल्या प्रकरणी दानापुर, ता.भोकरदन येथील जालना जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, जुनेद चौधरी, शेख अन्वर सत्तार, संतोष ठाकरे आणि राहुल शिंदे तसेच इतर काही जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या लोकांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बाजु कोणतीही हिंसा न करता शांततेत मांडून आंदोलन केले. कोणत्याही प्रकारे शासकीय मालमत्तेचे नुकसान त्यांनी न करता कोणत्याही अधिकारी/ कर्मचारी यांना त्यांनी अपशब्दांचा वापर किंवा अरेरावी त्यांनी केली नसून सुद्धा संबंधित तक्रारदार ग्रामसेवक दानापुर यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल केला आहे.

गावातील शांतपुर्ण वातावरणात ढवळा- ढवळी करण्याचे काम संबंधित ग्रामसेवक यांनी केले असून याचे समर्थन आम्ही ग्रामपंचायत सदस्य या नात्याने करीत नाही. संबंधितांवर दाखल झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेऊन वरील पदाधिकाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाव्दारे दानापुर ग्रामपंचायत सदस्य, गावकरी आणि तालुका कॉंग्रेस कमिटी यांनी मा.उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक भोकरदन यांच्याकडे केली आहे.

या निवेदनावर दानापुर येथील ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे, रूझयाबी जफर शेख, अंबादास कनगरे, अझा शेख, रामेश्वर दळवी, हुम्मा शेख, पुष्पा दळवी यांच्यासह गावकरी आणि काँग्रेसचे पदाधिकारी ता अध्यक्ष ञिबंकराव पाबळे, संतोष अन्नदाते, विश्वास वाघ, श्रावण आक्से, एजाज पठाण, विष्णु भालेराव, सोपान सपकाळ, रतन जाधव, रोषण देशमुख, राहुल घायवट, रविंद्र जाधव, नाना गावंडे, ईश्वर गावंडे, श्रीकांत देशमुख, ज्ञानेश्वर बोर्डे, रफिक कादरी, आंगद सहाने, अतुल घोडके यांच्या सह्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा