महसूल आणि पोलिसांशी संबंधित प्रकरणे पूर्ण पारदर्शकतेने आणि निष्पक्षतेने निकाली काढा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निर्देश

लखनऊ, १ ऑगस्ट २०२३ : उत्तर-प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिरात लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यादरम्यान मुख्यमंत्री योगींनी सुमारे ४०० लोकांची भेट घेतली. आपल्या कार्यकाळात कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी सर्वांना दिली. प्रत्येक पिडीतांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी महसूल आणि पोलिसांशी संबंधित प्रकरणे पूर्ण पारदर्शकतेने आणि निष्पक्षतेने निकाली काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. कोणावरही अन्याय होता कामा नये. प्रत्येक पीडित व्यक्तीला संवेदनशील वागणूक देऊन मदत केली पाहिजे. जे कोणाच्या जमिनी बळकावतात, त्याच्यावर अतिक्रमण करतात, जे दुर्बलांना त्रास देतात.अशा कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही परिस्थितीत सोडू नका.असे स्पष्ट निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करा. सरकार कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

यादरम्यान अनेक लोक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे उपचारासाठीच्या आर्थिक मदतीसाठी पोहोचले होते. उपचारासाठी सरकार पूर्ण मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री योगी यांनी दिले. उपचाराशी संबंधित अंदाज प्रक्रिया पूर्ण करून ती लवकरात लवकर शासनाकडे उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा