GAIL संचालकाच्या अनेक ठिकाणांवर सीबीआयचे छापे, लाच घेतल्याचा आरोप

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2022: सीबीआयने शनिवारी गेल संचालकांच्या ठिकाणांवर छापे टाकले. दिल्ली आणि नोएडा येथे त्यांच्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलीय. हे संपूर्ण प्रकरण लाचखोरीशी संबंधित असून गेलचे संचालक ईएस रंगनाथन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याच्यावर एफआयआरही दाखल करण्यात आलाय. छाप्यादरम्यान 1.30 कोटी रुपये आणि इतर अनेक जीवनावश्यक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

पेट्रोकेमिकल उत्पादनांवर सूट देण्यासाठी ईएस रंगनाथन यांनी मध्यस्थांमार्फत लाच मागितल्याचं सांगण्यात येत आहे. ई.एस.रंगनाथन याने एकूण दोन मध्यस्थांमार्फत हे काम केल्याचं तपासात समोर आलं आहे. एकूण आठ ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचं काही वृत्तांत सांगितलं जात आहे, मात्र अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही.

GAIL ही नैसर्गिक वायू प्रक्रिया आणि वितरण कंपनी आहे. याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. ई.एस. रंगनाथन यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून आरोप केले जात होते, एजन्सींना अनेक प्रकारचं इनपुटही मिळालं होतं. आता याच माहितीच्या आधारे शनिवारी ही कारवाई करण्यात आली आणि गेलच्या संचालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

तसे, याआधी सीबीआयने एनएचएआय बंगळुरूचे प्रादेशिक अधिकारी आणि इतर चार जणांवरही मोठी कारवाई केली होती. 20 लाखांच्या लाचप्रकरणी सीबीआयने चार जणांना अटक केली होती. अनेक शहरांमध्ये तपास यंत्रणेनं छापे टाकले होते, आरोपींच्या घरावरही छापे टाकले होते आणि त्यानंतर सर्वांना अटक करण्यात आली होती. त्या छाप्यात सुमारे चार कोटी रुपये जप्त करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा