सीबीआय आता महाराष्ट्रातही चौकशी करणार

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२२ : शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. २०२० मध्ये महाविकास आघाडीने केंद्र सरकार तपास यंत्रणांचा राज्य सरकारविरोधात गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. त्यातूनच सीबीआयला महाराष्ट्रात चौकशी करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. आता मात्र शिंदे सरकारने सीबीआयला राज्यात येण्याची परवानगी दिली आहे. आधीच तपास यंत्रणेच्या चौकशीच्या सापळ्यात अडकलेले मविआचे नेत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यात तपास करण्यासाठी पूर्वी सीबीआयला परवानगी घ्यावी लागत होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची चौकशी ही CBI ला करता आली नव्हती. मात्र, आता राज्यात सत्ता बदल झाला असून शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने ठाकरे यांचा निर्णय बदलत राज्यात तापासाठी सीबीआयला परवानगी घेण्याची गरज नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने CBI ला महाराष्ट्रात चौकशीसाठी गरजेची ‘जनरल कॅसेन्ट’ पुन्हा बहाल केली आहे. आता CBI ला चौकशीसाठी सरकारच्या परवानगीची गरज भासणार नाही त्यामुळे ईडी आणि इतर केंद्रिय यंत्रणानंतर आता सीबीआयमुळे विरोधकांची चांगलीच कोंडी होणार असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे सरकारने २०२० मध्ये सीबीआयला राज्यात चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी गरजेची केली होती. यावेळी अनिल देशमुख यांनी देखील या प्रस्तावयाचे स्वागत केले होते. राज्यात अनेक प्रकरणांची चौकशी ही सीबीआय मार्फत सुरू होती. या प्रकरणांचा तपास करताना राज्य सरकार या तपासाबाबत अनभिज्ञ राहत असल्याने महाविकास आघाडी सरकारने CBI ला तपासासाठी परवानगी घेण्याचे बंधनकारक केले होते.

यामुळे महाविकास आघाडीत असलेल्या अनेक नेत्यांच्या चौकशी करण्याबाबत सीबीआयला मर्यादा येत होत्या. ठाकरे सरकारचा हा निर्णय बदलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आता सीबीआयला चौकशीसाठी सरकारची परवानगी घेण्याची गरज नसल्याचे सांगत चौकशीची परवानगी पुन्हा बहाल केली. या निर्णयामुळे सीबीआय आता राज्यात कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकणार असून हा निर्णय महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा