सीबीआय आता महाराष्ट्रातही चौकशी करणार

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२२: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला आहे. ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात हायकोर्टाने मागच्या आठवड्यात अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, सीबीआय कोर्टाने जामीन नाकारल्याने अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.

मनी लाँड्रींग प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. मागील ११ महिन्यांपासून कारागृहात आहेत. या प्रकरणी देशमुख यांनी दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला. देशमुख यांनी सीबीआयच्या प्रकरणात जामिनासाठी केलेल्या अर्जावरील निकाल सत्र न्यायालयाने शुक्रवारी दुपारी सुनावला. काल गुरुवारी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतले आणि निकाल राखून ठेवला होता. ईडीप्रमाणे सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मिळून अनिल देशमुख दिवाळीपूर्वी तुरुंगाबाहेर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र जामीन नाकारल्याने ते आता जेलमध्ये राहणार आहेत.

दरम्यान, ७३ वर्षीय देशमुख सध्या अतिताण, हृदयविकार यांसारख्या विविध गंभीर आजारांनी त्रस्त आहेत.

काय आहे प्रकरण ?

अनिल देशमुखांवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सध्या अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ‘ईडी’नेही या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप ‘ईडी’कडून करण्यात आला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा