सीबीएसईच्या दहावी – बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून परीक्षा?

नवी दिल्ली, ३० डिसेंबर २०२२: सीबीएसईच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बोर्डाने काल याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या १५ फेब्रुवारी ते ५ एप्रिलदरम्यान होतील. तर २ जानेवारीपासून प्रॅक्टिकलला सुरुवात होणार आहे. यावेळी ३४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षा २०२३ साठी नोंदणी केली आहे

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने डेटशीट प्रसिद्ध केल्यानंतर आता विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbse.nic.in वर जाऊन त्यांची डेटशीट तपासू आणि डाउनलोड करू शकतील.

दरम्यान, सीबीएसईने म्हटले आहे की, इयत्ता १० वी, १२ वीची तारीखपत्रक करताना सुमारे ४० हजार विषयाचे संयोजन तयार केले आहे. जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याला एकाच तारखेला दोन विषयांसाठी उपस्थित राहावे लागणार नाही. केंद्रीय बोर्डाने पुढे सांगितले की, इयत्ता बारावीची तारीखपत्रिका तयार करताना, JEE मेन, NEET, CUET UG यासह इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखांशी टक्कर होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

  • असे डाऊनलोड करा वेळापत्रक

वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी cbse.gov.in य संकेतस्थळाावर जाऊन दहावी, बारावी परीक्षा शेड्युल २०२३ वर क्लिक करावे. त्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या दोन वेगवेगळ्या पीडीएफ तुम्हाला स्क्रिनवर दिसतील. विद्यार्थ्यांना दहावी, बारावी परीक्षेची डेटशीट डाऊनलोड करावी आणि प्रिंट आऊट काढावे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा