CBSE Result 2022, २२ जुलै २०२२: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने विद्यार्थ्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी डिजिलॉकरवरून निकाल पाहू शकतात. यावेळीही मुलींनीच बाजी मारली आहे. परीक्षेत ९४.५४ टक्के विद्यार्थिनी तर ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दहावीचा निकाल दोन वाजता
10वीचा निकालही दुपारी 2 वाजता अधिकृतपणे जाहीर होणार असल्याची माहिती सीबीएसईकडून देण्यात आली आहे. त्याचवेळी निकाल जाहीर झाल्याची माहिती शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे