

नवी दिल्ली, दि. १८ मे २०२० : सीबीएसई बोर्डच्या इयत्ता १० वी आणि १२ वी ची परीक्षा १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहे.
यामध्ये बारावीच्या २९ मुख्य विषयांच्या परीक्षांचा समावेश आहे. या वर्षी परिक्षा दोनदा थांबवाव्या लागल्या. ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेमुळे दहावीच्या काही परीक्षा स्थगित केल्या होत्या . यानंतर देशात कोरोना विषाणूमुळे परीक्षा पुन्हा थांबवाव्या लागल्या.
मात्र आता सीबीएसई ने नव्याने तारखा जाहिर केल्या आहेत. जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये या परिक्षा घेण्यात येणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी