सीडीएस बिपिन रावत यांचे निधन, हेलिकॉप्टर अपघातात पत्नीसह 13 जणांचा मृत्यू

10

नवी दिल्ली 8 डिसेंबर 2021:सीडीएस बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालाय. अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते. सीडीएस रावत यांच्या पत्नी मधुलिका रावतही हेलिकॉप्टरमध्ये होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्व नेत्यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केलाय.

तामिळनाडूतील कुन्नूरजवळ बुधवारी दुपारी हा भीषण अपघात झाला. ज्या हेलिकॉप्टरसोबत हा अपघात झाला ते भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 होते. दुहेरी इंजिन असलेले हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानले जाते. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत हे होते, त्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे