लोणी देवकरमध्ये साध्या पद्धतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

8

इंदापूर, दि.३१ मे २०२०: सध्या कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले आहे. जल्लोषात साजरे होणारे सण उत्सव यावर निर्बंध आले आहेत . त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कोणतेही कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे न करता अगदी साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर ग्रामपंचायतीच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९५ वी जयंती अगदी साध्या पद्धतीने साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला सरपंच अमोल तोरवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याची गरज असल्याचे मत सरपंच अमोल तोरवे यांनी व्यक्त केले. तसेच जयंती आणि उत्सव यावर खर्च न करता त्या पैशातून ग्रामपंचायतीमार्फत गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप देखील करण्यात आले असल्याची माहिती सरपंच तोरवे यांनी दिली.

शासनाने टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल केल्याने ग्रामीण भागातील नागरिक विनाकारण सर्रासपणे फिरताहेत तरी नागरिकांनी अजूनही विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन सरपंच तोरवे यांनी केले. यावेळी विजय डोंगरे, उपसरपंच दत्तात्रय राखुंडे,खंडू तोंडे आणि युवराज तोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा