अशी साजरी करा मैत्री …

पुणे, ३० जुलै, २०२२: मैत्री… एक प्रेमळ भावना, मैत्री…एक अतूट नातं, असं नातं ज्याला नाव नाही. असं नातं ज्याच्याशिवाय सहवास नाही. याच मैत्रीच्या नात्याला साजरा करण्याचा दिवस म्हणजे मैत्री दिन अर्थात फ्रेंडशीप डे…

३० जुलै हा आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे आहे. यादिवशी सहकार्य आणि मैत्रीच्या भावनेला प्राधान्य दिलं जातं. भारतात फ्रेंडशिप डे ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. माणसाच्या आयुष्यात मैत्रीला खुप अभुतपु्र्ण स्थान आहे. २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन हा एक उपक्रम आहे, जो युनेस्को संस्थेने भेदभाव दूर व्हावा या भावनेने सुरु केला आहे. तुमच्या मनातले हेवेदावे विसरुन तुम्ही मैत्रीदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येऊ शकता.
मैत्री करताना या गोष्टींचा विचार करा..

• मैत्री ही कधी समविचारांची असते तर कधी भिन्न विचाराची. पण मैत्रीतून कधी अपेक्षा बाळगू नका. अपेक्षाभंगाच दु:ख हे मैत्री तुटण्यापेक्षा जास्त असतं.

• मैत्री करताना, समोरची व्यक्तीच्या वयापेक्षा अनुभवाचा, विचार करा. त्यातून काय घेता येईल शिकता येईल, अशा व्यक्तीशी मैत्री करा.

• मैत्री करताना पुरुष, स्त्री असा आणि वयाचा विचार न करता मैत्री करा.

• समोरच्या व्यक्तीने तुमचा विश्वास संपादन करण्याइतका काळ त्या व्यक्तीबरोबर घालवा आणि मगच तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी त्या व्यक्तीशी शेअर करा.

• मैत्रीला परिभाषा नसते. पण कायम चांगल्या विचारांच्या व्यक्तीशी मैत्री करा. जेणे करुन तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांना प्रगल्भता मिळेल.

मैत्रीसाठी काही खास भेटवस्तू

• तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या आवडत्या गायकाच्या सीडी, लेखकांची पुस्तके, भेट देऊ शकता.

• एखाद्या छानशा पर्यटनस्थळी फ्रेंडशीप डे साजरा करु शकता.

• आवडत्या रेस्टॉरंटमध्ये लंच किंवा डिनर प्लॅन करु शकता.

• ड्रेस, शर्ट गोष्टी भेट देऊ शकता.

• तुम्हाला त्या मित्राबद्दल काय वाटतं? या संदर्भात पत्र किंवा ग्रिटींग करुन भेट देऊ शकता.

• छानसा सिनेमा प्लॅन करुन त्यातून संपूर्ण दिवस मैत्रीसाठी साजरा करु शकता.

मैत्री ही कायम मौल्यवान असते. त्यामुळे अशा मौल्यवान मित्रांना आणि त्यांच्या मैत्रीला मैत्रीदिनाच्या खूप शुभेच्छा
..HAPPY FRIENDSHIP DAY ..

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा