गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सूचना..!

9

लोणी काळभोर २० ऑगस्ट २०२०:कोरोना आजाराशी लढण्यासाठी साधेपणाने गणेश उत्सव साजरे करुन विधायक उपक्रमांना हातभार लावावा आरती व गणेश मूर्तीचे विसर्जन घरगुती पद्धतीने करा घरात दोन फूट व गणेशोत्सव मंडळांनी चार फूट उंची पेक्षा अधिक उंचीचे गणपती बसू नयेत, या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणार्‍यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जातील याची नोंद सर्वांनी घ्यावी तसेच कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिस यंत्रणा करत असते.

कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस यंत्रणेला सर्वांनी सहकार्य करावे असे आव्हान लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी केले आहे. लोणी काळभोर पोलिस ठाणे उरुळी कांचन परिसरातील गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश मंडळाचे अध्यक्ष, व कार्यकर्ते, पोलीस पाटील, गणेश मूर्ती बनविणारे कारखान्याचे प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उरळीकांचन पोलीस क्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, पोलीस कर्मचारी सचिन पवार, सोमनाथ चितारे, संदीप पवार, मोहन कुंजीर, रुपेश भगत, तसेच मंडळाचे अध्यक्ष व गणेश मूर्ती कारखान्याचे मालक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे