श्री विमलेश्वर विद्यालयात शिक्षक दिन साजरा

माढा, दि. ५ सप्टेंबर २०२०: माढा तालुक्यातील बेंबळे येथील श्री विमलेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बेंबळे येथे ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. ५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून भारतात सर्वत्र साजरा केला जातो.

याचे औचित्य साधून बेंबळे येथे श्री विमलेश्वर विद्यालयामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. एक शिक्षक या देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो हे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी देशाला दाखवून दिले, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गोविंद आप्पा भोसले आध्यक्षीय भाषणात म्हणाले. गोविंद भोसले यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सहशिक्षक एम पी गायकवाड यांनी मनोगत केले कि शिक्षकाकडे त्याग, माधुर्य, दानत या गोष्टी असायला हव्यात यामुळे शिक्षक समाजाला योग्य दिशा दाखवू शकतो व शिक्षक योग्य पिढी घडवू शकतो.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद भोसले संस्थेचे संचालक नागनाथ मस्के, पोलीस पाटील बिभीषण किर्ते, संस्थेचे प्राचार्य के आर हुलगे, दत्तात्रय ननवरे, महादेव अनपट आदीजण उपस्थित होते.

न्यूज अनकट: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा