छत्रपती संभाजीराजे यांची साध्या पध्दतीने जयंती साजरी

कर्जत, दि.१४.मे २०२०: मढे वडगाव येथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती योगपुरुष स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे भोसले यांची जयंती मढे वडगाव या ठिकाणी कोरोनाच्या भयानक आजारामुळे एकदम साध्या पध्दतीने प्रतिमा पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.

जयंतीनिमित्त प्रा.गोरख उंडे आणि प्रा.योगेश मांडे यांनी प्रशासनाला सहकार्य करा आणी कोरोनाला आपल्या देशातून हद्दपार करा. अशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरिकांना विनंती केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल साळवे, अभय गुंड, अक्षय ससाणे,आनंद ससाणे, आणी इतर तरुण मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा