बारामती : कोकरेवस्ती, उंडवडी येथे धनगर आरक्षणाचे जनक स्व.बी.के कोकरे यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला.
यावेळी क्रांतिसुर्य बी. के. कोकरे गौरव समितीचे अध्यक्ष विक्रांत काळे,माजी सरपंच विशाल कोकरे, सरपंच भारत बनकर,त्यात्यानाना कोकरे, अमोल वाघमोडे, समीर बनकर , समीर माकर , काका झारगड , आकाश दडस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विशाल कोकरे म्हणाले, मेंढपाळाच्या अनेक मागण्याबरोबर धनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण मिळावे यासाठी यशवंत सेनेच्या माध्यमातून तीव्र लढा उभा राहिला. परिणामी शासनाने धनगर समाजाची एस.टी. ची मागणी बाजूला ठेऊन भटक्या जमातीचे एन.टी आरक्षण बहाल केले. आत्तापर्यंत ओबीसी प्रवर्गात असलेल्या धनगर समाजाला एन.टी च्या सवलतीचा फायदा मिळाला असून त्याद्वारे कित्येक डॉक्टर , इंजिनीयर, अधिकारी झाले आहे. माळरानावर पाल टाकून शेंळयामेंढयासह कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या धनगर समाज्याच्या अस्मितेला जागे करण्याचे काम कै.बी.के.कोकरे यांनी केले.
विक्रांत काळे बोलताना म्हणाले मेंढपाळाचे अडचणी समस्या संपल्या नाहीत. आपले हक्क अधिकार व समाजाला जे अनुसूचित जातीच आरक्षण आहे ते लागु केले पाहिजे. आपले संघटन करावे यासाठी कोकरेनी यशवंत सेना स्थापन करुन समाजातील युवकांना एकत्र करण्याचे काम केले आहे. यावेळी उंडवडी गावातील लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.