यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा घरी राहूनच साजरा करा: खासदार संभाजीराजे

कोल्हापूर, दि.१ जून २०२०: कोरोनाच्या महामारीमुळे यंदा ६ जून रोजी रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांमध्ये पार पाडण्यात येणार आहे, त्यामुळे कोणीही रायगडावर न येता घरातच राहून राज्याभिषेक साजरा करावा, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले आहे.

यावेळी संभाजी राजे म्हणाले की, स्वराज्याचे प्रतिक असलेला भगवा ध्वज घरासमोर लावावा. शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे. स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. तसेच शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करु नये, अशी विनंती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

‘एकच धून सहा जून’ असं म्हणत दरवर्षी अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी सहा जूनला दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावत असतात. यंदा मात्र शिवभक्तांना कोरोनामुळे रायगडावर न येण्याचे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा