मराठा सेवा संघाचा ३० वा वर्धापन मोठ्या दिमाखात साजरा

माढा, २ सप्टेंबर २०२० : माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे आनोख्या पद्धतीने मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कोविड महामारीमध्ये जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलीस बांधव, आरोग्य कर्मचारी आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करून मराठा सेवा संघाचा ३० वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष अमित निमकर,तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,तालुका सचिव सचिन शिंदे, आदींच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती चौक करमाळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पूजन करून अभिवादन करण्यात आले.

मराठा सेवा संघ पदाधिकाऱ्यांच्या वतीने करमाळा पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल डुकरे, मुख्याधिकारी वीणा पवार यांचा व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्व कोविड योध्यांचा गौरव करत त्यांचा सत्कार करण्यात आला व सर्व कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना संतोष शितोळे यांनी मराठा सेवा संघाच्या ३० वर्षांच्या कामगिरीचा आलेख उपस्थितांसमोर मांडत भविष्यकाळात मराठा सेवा संघ बहुजन समाजाच्या उन्नतीच्या वाटेतील मैलाचा दगड ठरेल असा आशावाद व्यक्त केला. अतुल वारे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा