वाल्हे येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

पुरंदर, दि. २२ सप्टेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षि वाल्मिकी विद्यालयामध्ये आज मंगळवार (दि.२२) कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती शासकीय नियांचे पालन करीत उपस्थितीत साजरी करण्यात आली.

रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव आर.डी.गायकवाड यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमोद शहा, विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत जाधव, बाबासाहेब कुंभार, डॉ.हेमलता गायकवाड, पी.बी.जगताप, अतुल गायकवाड उपस्थित होते.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंतीनिमित्त ऑनलाईन पद्धतीने  विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध व वकृत्व स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा घे्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विद्यालयातील ३८८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमधील विजेत्यांना ईमेलद्वारे ऑनलाईन प्रमाणपत्र पाठविण्यात आल्याची माहिती प्राचार्य चंद्रकांत जाधव व पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार यांनी दिली.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे –

ऑनलाईन वकृत्वस्पर्धा, लहानगट:
५वी ते ८वी:- करण सागर भुजबळ (प्रथम), निशा उत्तम गायकवाड (द्वितीय), कार्तिकी एकनाथ बुनगे (तृतीय).

मध्यमगट:
८ वी ते १० वी:- पदमश्री मनोजकुमार भुजबळ (प्रथम), अनुजा नवनाथ भुजबळ(द्वितीय), वैष्णवी विजयकुमार रावत (तृतीय).

मोठा गट:
११ वी ते १२ वी: प्रियंका विक्रम पवार (प्रथम), प्राजक्ता राजेंद्र जगताप (द्वितीय), आदिती कैलास भुजबळ (तृतीय)

ऑनलाईन निबंधस्पर्धा, लहानगट:
५वी ते ८वी: असिन अमर आतार (प्रथम), वेदांत नितीनकुमार पवार (द्वितीय), तनिष्का नितीन भुजबळ (तृतीय).

मध्यमगट:-
८ वी ते १० वी:-गौरी प्रशांत रोकडे (प्रथम), वैभवी राजाराम रोकडे (द्वितीय), चैतन्य सुजित देशमुख(तृतीय).

मोठा गट:
११ वी ते १२ वी:-अश्विनी दत्तात्र यादव(प्रथम), सानिका विश्वास चव्हाण (द्वितीय), सलोनी अमर आतार (तृतीय).

विजय स्पर्धकांचे विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत जाधव य पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार यांनी अभिनंदन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा